Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीमहाराष्ट्र अंनिस व माळी समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन मोठ्या...

महाराष्ट्र अंनिस व माळी समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन मोठ्या उत्साहात साजरा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- माळी समाज बांधव व महाराष्ट्र अंनिस गडचिरोलीच्या स्थानिक फुले वार्डातील हनुमान मंदिराजवळ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन ३ जानेवारी रोजी जयंती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाज गडचिरोलीचे अध्यक्ष मोतिराम पाटील वाढई,प्रमुख अतिथी म्हणून फुलचंद गुरणूले,महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, जिल्हा प्रधान सचिव पुरुषोत्तम ठाकरे,महाराष्ट्र अंनिस नवेगांव शाखेचे  सुखदेव जेंगठे याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रभाताई सोनुले द्वारा सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित गीत  सादरीकरणाने झाली.याप्रसंगी बोलताना विठ्ठलराव कोठारे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती देऊन त्यांचे कार्य संबंध स्त्री-वर्गासाठी प्रेरक व ऐतिहासिक होते असे म्हटले तर ठाकरे यांनी माळी समाजाची वर्तमान काळात शिक्षणाबद्दलची अनास्था, मुला-मुलींचे अत्यल्प शिक्षण व व्यसने याबद्दल चिंता व्यक्त केली व शिक्षणानेच माणसाची प्रगती होऊ शकते; असे सांगून सर्व समाज बांधवांनी आपल्या मुला-मुलींना अधिकाधिक उच्च शिक्षण घेण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन केले.तर मुकुंदराव उंदिरवाडे यांनी  आपले मनोगत व्यक्त करतांना संगीतले की डॉ. बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानले व शिक्षणाच्या बळावरच सामाजिक  परिवर्तन घडवून आणले.कु.संगवी मोहुर्ले व अनुष्का गुरणूले यांनी सावित्रीचा वेष परिधान करुन त्यांच्या जिवनातील काही प्रसंगाचे उत्कृष्ठपणे सादरीकरण केले.  कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र आणि शहर शाखेचे प्रधान सचिव हरिदास कोटरंगे यांनी तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र अंनिस शहर शाखेचे कार्याध्यक्ष  उपेंद्र रोहनकर यांनी केले.यावेळी विजय शेंडे,संजय शेंडे, वामन वाढई,नरेश महाडोळे,अनिता शेंडे,ताराबाई निकोडे व माळी समाजातील अनेक मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजातील युवा कार्यकर्ते चेतन शेंडे व माळी समाज तसेच बहुसंख्य नागरिक यांनी विशेष प्रयत्न केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!