Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीअजय कंकडालवार सहीत भाजप व राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी केला कांग्रेसमध्ये प्रवेश……-विजय वडेट्टीवार यांची...

अजय कंकडालवार सहीत भाजप व राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी केला कांग्रेसमध्ये प्रवेश……-विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

प्रा.मुनिश्वर बोरकर/ गडचिरोली :- राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व भरगच्य कांग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजयभाऊ कंकडालवार सहीत भाजपाचे व राष्टवादी कांग्रेसच्या अनेक प्रमुख कार्यकत्यांनी आलापल्ली येथील कांग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला असुन अहेरी विधानसभा आता कांग्रेसमय होणार आहे.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांचे आलापल्लीत आगमन होताच आदिवासी नृत्याने व ढोल ताश्याच्या निनादात स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर विजय वडेट्टिवार,अजय कंकडालवार. कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान,ॲड.कविता मोहरकर,डॉ.नितिन कोडवते,डॉ.चंदा कोडवते,सगुणा तलांडी,माजी जि. प. सदस्य ॲड.राम मेश्राम,रवि शहा,डॉ.निसार हकीम , सोनाली कंकडालवार आदि उपस्थित होते.याप्रसंगी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार म्हणाले की,अजय कंकडालवार यांचे कार्य,समाजसेवा,गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणे कुणीही नाकारू शकत नाही. आज विजय आणि अजय जोडी एकत्र आली आहे. आता अहेरी- सिरोंचा विधानसभा क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.सदर क्षेत्र आता कांग्रेसमय दिसेल यात शंकाच नाही.अजयभाऊ कंकडालवार यांनी कांग्रेस पक्ष प्रवेशा नंतर सत्काराला उत्तर देताना म्हणाले की मी ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष पर्यंत मजल मारली तेही काँग्रेसच्या सहकार्याने मी ज्यांना साथ दिली मोठ केलं ते या ना त्या पक्षात जावून गद्दार झालेत.मी गोरगरीबाची सेवा केली पुढेही करीत राहीन व कांग्रेसला बळकटी देईन.प्रसंगी भाजप नेते सुधाकर नाईक,माजी आर एफ ओ मडावी,आविस नेते नंदू नरोटे,बन्नया जगनाम,सुधाकर तिम्मा व राष्टवादी चे कार्यकर्ते सहीत अनेकांनी कांग्रेसचा दुप्पटा बांधला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रज्यला नागुलवार यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!