Friday, October 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता मुला-मुलींच्या नावापुढे आईचे नाव व त्यानंतर लागणार वडिलांचे नाव

आता मुला-मुलींच्या नावापुढे आईचे नाव व त्यानंतर लागणार वडिलांचे नाव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्य सरकारने मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात चौथे महिला धोरण आणले आहे.त्या अंतर्गत आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आदिती तटकरे या महिला असल्याने त्यांनी अत्यंत बारकाईने हे धोरण आखत ते राज्य सरकारपुढे आणले आहे.त्यानुसार यापुढे मुला-मुलींच्या नावापुढे आई व त्यानंतर वडिलांचे व शेवटी आडनाव लागेल.जसे,की उदाहरणार्थ सचिन लता रामेश्वर झोंगे असे असणार आहे.महिला हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.त्यामुळे आईचे नाव यापुढे लागेल.अर्थमंत्री या नात्याने मी महिलांसाठी काही निर्णय घेतले आहेत.त्यानुसार सदनिका खरेदीवर महिलांसाठी एक टक्का सूट दिली गेली आहे. पुरुषाच्या नावे हा व्यवहार होणार असल्यास ६ टक्के तर महिलांच्या नावे होणार असल्यास ५ टक्के कर द्यावा लागेल.५० लाखांचे घर महिलेच्या नावे घेतले. तर त्या कुटुंबाचे ५० हजार रुपये कर रुपाने वाचतील. त्यामुळे पतीराज जर नवीन घर घेणार असतील,तर महिलांनीच ते घर माझ्या नावावर करा, कर कमी लागेल,अशी मागणी करायला पाहिजे,असेही पवार म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!