Friday, October 23, 2026
Homeभंडारासाहित्य बांधकामाचा चेक बाउन्स झाला अन् गैरप्रकार उजेडात आला…-ऑनलाइन जुगार खेळण्याच्या नादात...

साहित्य बांधकामाचा चेक बाउन्स झाला अन् गैरप्रकार उजेडात आला…-ऑनलाइन जुगार खेळण्याच्या नादात ग्रामसेवकाने चक्क ३१ लाख उडवले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक राकेश वैद्य याने ऑनलाइन जुगार खेळण्याच्या नादात चक्क ३१ लाख रुपयांची चोरी केली.यासाठी सरपंच व खंडविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतील विविध खात्यातून पैशाची उचल केली.बिंग फुटताच सोमवारला चौकशी अधिकाऱ्यासमक्ष त्याने दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगाराच्या नादात गैरप्रकार केल्याची कबुली दिली.प्रकरणी ५ सदस्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.गैरप्रकारात सरपंच, उपसरपंच,खंडविकास अधिकारी यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करीत फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. ग्रामसेवक राकेश वैद्य यांच्याकडे देव्हाडा व खडकी ग्रामपंचायतीचा कारभार आहे.देव्हाडा बुज ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात साईबाबा मंदिर आवार भिंत बांधकामाचे १९ लाख तसेच घरटॅक्स मिळून २९ लाख रुपये जमा होते.त्यापैकी २८ लाख ४० हजार रुपये सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून उचल केले, तसेच पाणीपुरवठा फंडातून ५० हजार रुपये,तर अमानत फंडातून ७८ हजार रुपयांची उचल केली. तसेच खंड विकास अधिकारी यांचे संयुक्त खाते असलेल्या दलितवस्ती सुधार फंडातील १ लाख ३ हजार रुपयांपैकी एक १ लाख रुपयांची उचल केली. राकेश वैद्य यास दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद जडला होता.जुगार खेळण्यासाठी त्याने सन २०२२ पासून बनावट स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्याचा गोरखधंदा चालविला होता. ग्रामसेवकाचा हा गैरप्रकार सरपंच,उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना माहिती न देता सुरू होता. अनेकदा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी पासबुक मागितले असता घरी आहे,नंतर दाखवतो,असे बोलून वेळ मारून नेत होता.दरम्यान साईबाबा मंदिर आवार भिंतीची रक्कम सामान्य फंडात जमा होती.त्या बांधकामाचे चेक साहित्य पुरवठाधारकाने बँकेत लावला असता तो बाउन्स झाला अन् गैरप्रकार उजेडात आला.

प्रकरणी तक्रार प्राप्त होताच सोमवार ४ डिसेंबर ला पंचायत विस्तार अधिकार बोदेले यांनी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाची चौकशी केली असता; ग्रामसेवकाने ऑनलाइन जुगाराच्या नादात गैरप्रकार केल्याचे कबूल केले.त्याच वेळी ९ लाख रुपये बँकेतील सामान्य फंडात जमा केले.उर्वरित रक्कम लवकरच जमा करण्याचे लेखी पत्र दिले.

दुर्योधन बोंदरे,ग्रामपंचायत सदस्य,देव्हाडा बुज 👇

सरपंच व प्रभारी सरपंच यांच्या कार्यकाळातील गैरप्रकार असून खंड विकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यातूनही रक्कम काढली गेली आहे. गैरप्रकारात अन्य सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही पाच सदस्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे.आरोपी मोकाट असून रेकॉर्डमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता आहे.तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची गरज आहे.

भीमगिरी बोदेले,पंचायत विस्तार अधिकारी,मोहाडी 👇

देव्हाडा ग्रामपंचायतीमधील गैरप्रकाराप्रकरणी चौकशी केली असता ग्रामसेवकाने परस्पर पैसे काढल्याचे मान्य केले व मान्य पत्र दिले आहे.ग्रामसेवकाने काही रक्कम बँकेत जमा केली आहे. याप्रकरणी चौकशी अहवाल वरिष्ठांना सोपविला जाईल.

,

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!