उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली:- भारतीय हवामान विभागाच्या,प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने वर्तविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार २४ नोव्हेंबर पासून ते आज २८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान नागपूरसह गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील काही भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना होण्याची संभावना हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
२४ नोव्हेंबर पासून ते काल २७ नोव्हेंबर पर्यंत जरी पावसाने हजेरी लावली नसली तरीही आज आभाळ सगळीकडेच झाकलेला दिसून येत आहे.गावांमध्ये तसेच मुख्य मार्गांवर धुके पडू लागले आहेत.अशातच गुलाबी थंडी बरोबरच काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

