उद्रेक न्युज वृत्त :- पंतप्रधान किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याची जे शेतकरी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते; अशी प्रतीक्षा आज संपुष्टात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी येथून ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १५ वा हप्ता हस्तांतरित केला आहे.तब्बल १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेतली आणि भाड्याने शेती केली असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.पीएम किसानमध्ये जमिनीची मालकी आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पद भूषविल्यास त्याला त्याचा लाभ मिळणार नाही.एवढेच नाही तर शेती करीत असणारे डॉक्टर,इंजिनीअर,सीए,वास्तुविशारद,वकील अशा व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली-पिएम किसान योजनेचा १५ वा हफ्ता बँक खात्यात झाला जमा
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

