Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजशंकरपूर येथे गाय-गोधन आणि ढाल पूजन उत्सव साजरा -३०० वर्षाची परंपरा आजही...

शंकरपूर येथे गाय-गोधन आणि ढाल पूजन उत्सव साजरा -३०० वर्षाची परंपरा आजही कायम….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या  मौजा शंकरपूर येथे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून गावातील गोवारी समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गाय-गोधन आणि ढाल पूजन उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

शंकरपूर गावामध्ये गोवारी समाजाच्या बांधवांची लोकसंख्या जास्त आहे.दरवर्षी रीतीरिवाजाप्रमाणे गाय गोधन व ढाल पूजन करून उत्सव साजरा करतात.प्राचीन काळापासून गोवारी समाजाचा मुख्य व्यवसाय हा गायी,ढोरे चारने असून चराइसाठी जंगल परिसरात गायी,ढोरे नेले असता त्यांचे संरक्षण व्हावे; या करिता वाघोबा देवाची आणि नागोबा देवाची पुजा  करण्याची परंपरा आजही कायम आहे.ही ३०० वर्षाची परंपरा शंकरपूर येथील नागरिक आजही पार पाडीत आहेत.उत्सवा निमित्त विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,भाग्यवान खोब्रागडे, परसराम टिकले,ज्ञानदेव परशुरामकर,रामदासमसराम, गोपाल उइके व गावातील गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विनायक वाघाडे,जगदीश शेंदरे,अमृत ठाकरे,प्रल्हाद वाघाडे आणि समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!