Saturday, April 18, 2026
Homeनागपूरक्रूर-कृत्य; दोन नोकरांनी; दिवाळी सणाच्या मजुरीवरून भाजपा पदाधिकाऱ्याची केली हत्या

क्रूर-कृत्य; दोन नोकरांनी; दिवाळी सणाच्या मजुरीवरून भाजपा पदाधिकाऱ्याची केली हत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- उमरेड तालुक्यातील सुरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि भाजपाचे उमरेड तालुका महामंत्री राजू ढेंगरे  वय ४८ वर्षे रा.दिघोरी,नागपूर यांची शुक्रवारी मध्यरात्री निर्दयीपणे हत्या करण्यात आली.ढेंगरे यांचा नागपूर-उमरेड महामार्गावरील कुही फाट्यालगत ढाबा आहे.शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २:३० वाजण्याच्या सुमारास ते गाढ झोपेत असतानाच ढाब्यावर काम करणाऱ्या दोन नोकरांनी त्यांचा गळा आवळून डोक्यावर काठीने हल्ला केला.

तीन वर्षांपासून ढेंगरे हे कुही फाट्यालगत ढाबा चालवतात.ढाबा सोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात या परिसरात त्यांचे नाव आहे.नुकत्याच पार पडलेल्या सुरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ते सदस्य म्हणून विजयी झाले होते.महिनाभरापूर्वी त्यांनी ढाब्यावर मंडला आणि आदी नामक दोन नोकर ठेवले होते.दोन्ही नोकरांना दिवाळीसाठी गावाकडे परत जायचे होते.त्यांनी राजू ढेंगरे यांना मजुरी मागितली.यावरून भांडण झाले.थोडा वादही उद्भवला.ढंगरे यांचे नागपुरातील दिघोरी येथे निवासस्थान आहे.कधी ढाबा तर कधी घरी असा त्यांचा मुक्काम असायचा शुक्रवारी उशीर झाल्याने ते ढाब्यावर असलेल्या खाटेवरच झोपले.ते गाढ झोपेत असताना आरोपींनी कापडाने गळा आवळला व काठीने वार केले.यामध्ये ढेंगरे गंभीर जखमी होत जागीच ठार झाले.त्यांच्या चेहऱ्यावर,मानेवर,डोक्यावर गंभीर मार आहे.या घटनेनंतर आरोपी पसार झाले.या संपूर्ण घटनेवेळी अन्य एक पांडू नावाचा नोकर घटनास्थळी होता.कुही पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ढेंगरे यांनी दोन्ही नोकरांना कामावर ठेवतान आधारकार्डही घेतले नसावे, यामुळे त्यांचा पत्ता लागू शकला नाही.आता केवळ मोबाइलचा सीडीआर तपासल्यानंतरच मोबाइलचा एक धागाच या खुनाच्या तपासात तपास यंत्रणेला कामाचा ठरणार आहे.हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी ढेंगरे यांचे चारचाकी वाहन पळवले.ढाब्यावरच त्यांची एमएच ४०,एसी ७७०७ ही अल्टो गाडी उभी होती.आरोपींनी वाहनाची चावी घेत चारचाकी पोबारा केला.मृत राजू डेंगरे यांनी नोकरांना कामावर ठेवताना त्यांच्याकडून कोणतेही कागदपत्रे घेतली नाहीत. आरोपींचे नाव आणि गाव कुणालाही माहिती नाही. त्यांच्या बोलीभाषेवरून ते मध्य प्रदेशातील असावेत, असा कयास लावला जात आहे.घटनास्थळावरून आरोपींनी चारचाकी वाहन पळविल्यानंतर काही अंतरावर जात नाहीत तोच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.विहीरगाव पुलालगत असताना अल्टो कार पलटली.या अपघातानंतर काहींनी धाव घेत दोघांनाही सहीसलामत बाहेर काढले.अशातच काही अंतरावर पुन्हा एका वाहनाचा अपघात झाला.लोकांनी दुसऱ्या अपघात स्थळाकडे धाव घेतली तर इकडे या दोन्ही आरोपींनी अपघात स्थळावरूनही पळ काढला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!