उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा येथील सार्वत्रिक निवडणूकीत १३ पैकी ११ जागेवर सावकार गट प्रणीत शेतकरी एकता पॅनलने, कांग्रेस समर्थित परिवर्तन पॅनलचा धुवा उडवून एकतर्फी विजय मीळवत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर वर्चस्व कायम केले.
काल सोमवार ६ नोव्हेंबर रोजी कुरखेडा आविका संस्था येथे सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर नंतर मतमोजणीला सुरुवात झाली असता विजयांची उत्सुकता दोन्ही पॅनलला लागली असताना मतदान प्रक्रिया अत्यंत चूरशीची ठरलेल्या या निवडणूकीत कांग्रेस प्रणीत परिवर्तन पॅनलचे सुफडासाफ करित शेतकरी एकता पॅनलनी विजयाचा गुलाल उधळला.
यावेळी विजयाचे शिल्पकार ठरणारे सहकार जेष्ठ नेते वसंतराव मेक्षाम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, भाजपा तालुका अध्यक्ष पुर्व आविकाचे उपसभापती चांगदेव फाये यांचा नेतृत्वात शेतकरी एकता पॅनलचे विजयी उमेदवार चांगदेव फाये, अँड . उमेश वालदे,पुंडलिक नागपूरकर महाराज शालिक मेक्षाम,बाबुराव तुलावी,तानाजी उईके, काशीनाथ पुडो, यमुना मडावी, सोनाबाई मडावी, यमुना कचलाम या उमेदवारानी दणदणीत विजय मीळविला तर प्रतिस्पर्धी काग्रेस गटाचे फक्त पुंडलिक निपाने व चिंतामण जुमनाके यानाच विजय मीळविता आला.यावेळी शेतकरी एकता पॅनलचे विजयी उमेदवार यांचे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये , माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दोषहरराव फाये यांच्या वतीने त्यांचा स्वागत करण्यात आला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी १ सूशील वानखेडे यानी जबाबदारी पार पाडली.शेतकरी एकता पॅनल च्या विजयात सहकार जेष्ठ नेते वसंतराव मेश्राम,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, ओबीसी नेते रविंद्र गोटेफोडे, भाजपा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, नगरसेवक रामभाऊ वैध,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोनेश मेश्राम, उल्हास देशमुख, राहूल गिरडकर कार्यकर्ते यानी सहकार्य केले.विजयी उमेदवारांनी सर्व मतादारांचे आभार मानले.

