Thursday, October 15, 2026
Homeनागपूरकामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी; नागपूरच्या सात पोलिसांची उचलबांगडी….

कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी; नागपूरच्या सात पोलिसांची उचलबांगडी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- कामात हलगर्जीपणा केल्यामुळे नंदनवन ठाण्याच्या तपास पथकातील ७ पोलिस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.त्या सर्व वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.बनावट नोटा प्रकरण आणि गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेले अपयश यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत जमील अहमद यांचा मोहम्मद परवेज सोहेल, सलमान खान समशेर खान पठाण (२७) हसनबाग,आणि आशिष सोहनलाल बिसेन (१८) खरबी चौक यांनी गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली होती.यामधील आरोपी सलमान खान हा कुख्यात आबू खानचा भाचा आहे. सलमानवर यापूर्वी अनेक दाखल असताना नंदनवन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते.मात्र, पोलिसांनी सलमानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले.तसेच नुकताच एटीएसने परवेज ऊर्फ पप्पू पटेल याच्या घरावर छापा घालून २७.५० लाख रुपये जप्त केले होते.पप्पूसोबतही डीबी पथकाचे अर्थपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सात पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करून पोलिस मुख्यालयात करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!