Saturday, June 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशासकीय कार्यालयात कुणी 'सर', 'मॅडम' वा 'साहेब' नसतो....- 'ते' तर आमचे लोकसेवक....!...

शासकीय कार्यालयात कुणी ‘सर’, ‘मॅडम’ वा ‘साहेब’ नसतो….- ‘ते’ तर आमचे लोकसेवक….! तरीही काहींची साहेबगीरी सुरूच… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- सर्वसामान्य नागरिक वा जनतेला अजूनही कळलेले नाही की,कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी हे आपल्यासाठी ‘साहेब’, ‘सर’ वा मॅडम नसतात; ते तर जनतेची कामे करणारी लोकसेवक असतात.आम्ही आहोत म्हणून ते आहेत; आमचे काम करण्यासाठीच ते बसले आहेत.फरक मात्र एवढाच की,आम्ही उन्हा-तानात काम करतोय तर ते खुर्चीवर बसून आरामदायक हवा घेत काम करतात.आम्ही त्यांना आदराने सर,मॅडम वा साहेब म्हणतो; म्हणूनच त्यांची कॉलर टाईट होत असते.काहीजण अजूनही साहेबगीरीच्या भ्रमात आहेत; मात्र त्यांना अजूनही कळलेले नाही की ‘ते’ जनतेचे लोकसेवक आहेत.

लोकसेवक तुमचे-आमचे कामे करण्यासाठीच बसलेले आहेत.अशांना दर महिन्याला त्याचेच तर वेतन(पगार) शासन देतेय.शासन आपल्या खिशातून पगार देतो काय? तर नाही.हे तुमच्या-आमच्या कडून ‘याची टोपी त्याच्यावर तर त्याची टोपी याच्यावर’ असे करूनच धिंच्याक-धीच्यांक करीत असतात.सध्याच्या घडीला कितीतरी शासकीय कार्यालये हल्ली कार्यरत आहेत. ज्यांची नावे सुध्दा अनेकांना माहिती नाहीत.मात्र अशी कितीही शासकीय कार्यालये कार्यरत असली वा त्या कार्यालयात कितीही मोठा अधिकारी व कर्मचारी पदावर असला तरीही ‘तो’ असा अधिकारी वा कर्मचारी हा जनतेचा लोकसेवकच गणला जातो.जो कुणी सरळ सेवा भरती,महाराष्ट्र लोकसेवा आयोग,केंद्रीय लोकसेवा आयोग वा इतर क्षेत्रातून कितीही प्रावीण्य मिळविला असेल तरीही ‘तो’ जनतेचा लोकसेवकच आहे.जनतेच्या सेवेसाठीच ‘तो’ खुर्चीवर विराजमान झालेला आहे.ज्याच्या अंगात साहेबगीरी असेल; असा अधिकारी,कर्मचारी घरी बसून ठण-ठण गोपाला केल्याशिवाय राहणार नाही. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!