Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीमासिक सभेवर साखरा ग्रामपंचायतीचे सदस्य टाकणार बहिष्कार...- सरपंच मनमानी कारभार करीत असल्याचा...

मासिक सभेवर साखरा ग्रामपंचायतीचे सदस्य टाकणार बहिष्कार…- सरपंच मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीतील उपसरपंचासह सदस्य मासिक सभेवर बहिष्कार टाकणार आहेत.यासंदर्भातील पत्र जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना आज २४ मे रोजी पत्र सादर करण्यात आले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत साखरा येथील विद्यमान सरपंच पुण्यवान सोरते हे ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेणे,उपस्थितांना बाकी सदस्यांविरुद्ध भडकविणे,मासिक सभेचे नोटीस वेळेवर न काढणे,मासिक सभेत कोणत्याही प्रकारची सदस्यांसोबत चर्चा न करता परस्पर आपल्या मताने ग्रामसभेचे आयोजन करणे इत्यादी बाबी ग्रामपंचायतमध्ये होत आहेत.यासंदर्भात विद्यमान सरपंच यांना विचारणा केली असता ते उद्धटपणे उत्तरे देतात.या त्रासाला कंटाळून सर्व सदस्य २४ मे ला होणाऱ्या मासिक सभेवर व यापुढे ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार टाकत असल्याची माहिती जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली तथा सचिव ग्रामपंचायत साखरा यांना पत्रातून दिली आहे. निवेदन देतांना ग्रापंचे पदाधिकारी अर्चना बोरकुटे, कांचन चौधरी,जयमाला मेश्राम,अश्विनी जनबंधू, दिनेश चौधरी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!