Monday, August 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात विजेचा लपंडाव...- विद्युत पुरवठा विभाग गाढ झोपेत; उकाड्याने नागरिकांचे बेहाल....

देसाईगंज तालुक्यात विजेचा लपंडाव…- विद्युत पुरवठा विभाग गाढ झोपेत; उकाड्याने नागरिकांचे बेहाल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली):- ऐन उन्हाळ्याच्या दिवसात देसाईगंज तालुक्यात दररोज कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री-बेरात्री विजेचा लपंडाव सुरू आहे.अशातच उकाड्याने नागरिकांचे बेहाल होत असूनही देसाईगंज विद्युत पुरवठा विभाग एवढे गाढ झोपेत कसे?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

देसाईगंज तालुक्यात हल्ली वीज जाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून जणूकाही वीज समस्येची फॅशनच झाली असल्याचे दिसून येत आहे.जसे ‘फॅशन शो’ च्या वेळेस रॅम्प वॉक केले जाते; तशाच प्रकारचे वीज जाण्याचे ‘रॅम्प वॉक’ सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे.वादळ वारा काही वेळासाठी तर विजेचा लपंडाव कितीही काळासाठी असल्याने देसाईगंज विद्युत पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार दिसून येतोय.

वीज असो वा नसो विद्युत बिल सारखेच; अशातही विद्युत बिल भरणा करण्यास महावितरण कंपनी कडून तगादा लावला जातो.मात्र विजेच्या लपंडावाने नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे; त्याची भरपाई देणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत.विजेवर चालणारे पंखे,कुलर व इतर साहित्यही उकाड्यामुळे काम करीत नाही.अशातच वीजेची समस्येने आणखी त्यात भर पाडून नागरिकांचे घामामुळे ‘टीप-टीप बरसा पाणी’असे होत आहे.काही सुजाण नागरिकांच्या मते,जाणून बुजून वीज वाचविण्याकरिता विजेचा लपंडाव तर सुरू नसावा ना..!अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.काही काळ जरी वीज बंद ठेवली गेली तरी भरपूर व मोठ्या प्रमाणावर वीजेची बचत होऊन विद्युत वितरण कंपनीस त्याचा लाभ होत असतो.लाभासाठी हल्ली कुणी कुठलेही पाऊल उचलू शकतात; असे म्हणणे चुकीचे ठरुच शकणार नाही.  

दररोज दिवसाढवळ्या,रात्री-बेरात्री जाणाऱ्या विजेमुळे नागरिकांचे बेहाल होत असल्याने ‘ये ना चॉलबे’ यासाठी देसाईगंज विद्युत पुरवठा विभागाने याकडे कानाडोळा न करता विजेच्या समस्येवर उपाययोजना करून त्यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा;अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!