Sunday, June 21, 2026
Homeकुरुडमोठी बातमी, कुरूड येथील इसमाने गळफास लावुन केली आत्महत्या....

मोठी बातमी, कुरूड येथील इसमाने गळफास लावुन केली आत्महत्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरूड :- देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुडयेथील गेंदलाल किसन ठाकरे वय ४५ वर्षे या इसमाने पहाटे ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज १८ एप्रिल २०२३ रोजी उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,गेंदलाल ठाकरे यांच्या घरी काही नागरिक गेले असता घराच्या आतमधून दार बंद असल्याचे आढळून आले.बराच वेळ गेंदलाल ठाकरे यांना आवाज देऊन व दार ठोठावूनही त्यांनी कसलाही प्रतिसाद न दिल्याने काही जणांनी गावातील पोलीस पाटील मंगेश मडावी यांना सदर प्रकरणी माहिती दिली.पोलीस पाटील व नागरिकांनी दार उघडुन बघता गेंदलाल ठाकरे हे घरातीलच एका  खोली मध्ये घळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.लगेच पोलीस पाटील मंगेश मडावी यांनी सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास दिली.देसाईगंज पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन सदर प्रेत शविच्छेदनाकरीता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात नेले असल्याची माहिती मिळाली आहे.आत्महत्येचे कारण अद्यापही कळलेले नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस विभाग करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!