- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,मंगळवार २७ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.सुनील काशिनाथ पुंड वय २७ वर्षे, रा.नैनपूर,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,सुनील हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता.अश्यातच आज सकाळी सुनीलचे वडील व लहान भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते,तर त्याची आई कपडे धुण्याकरिता बाहेर गेली होती.त्याची आई काही वेळाने घरी परतली असता सुनील हा घराच्या समोरील हॉलमधील सीलिंगच्या हुकाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. समोरील दृश्य पाहून आईने एकच खंबरडा फोडला. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ देसाईगंज पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुनीलला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात नेले.तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.दरम्यान, पोलिसांना सुनीलच्या खिशात एक चिट्ठी सापडली आहे.चिठ्ठीत आत्महत्येचे कारण नमूद असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.प्राथमिक माहितीनुसार सदरची आत्महत्या ही प्रेम संबंधातून झाल्याची चर्चा असून याबाबत अधिकची स्पष्टता ही पोलीस तपासातून उघड होणार आहे.प्रकरणाचा पुढील तपास देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुंड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

