- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,वर्धा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश असून एकूण ३८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.मात्र,गेल्यावेळी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विजय मिळवून सहा दशकांपासून जनसंघ,भाजपची असलेली मक्तेदारी संपुष्टात आणल्याने या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कुठल्याही स्थितीत ही जागा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपचे नेते आणि पदाधिकारी मैदानात अहोरात्र कामाला लागले आहेत.विशेष म्हणजे,काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात थेट लढतीचे चित्र आहे.अश्यातच मतदारांना बाहेर काढण्याचे सर्वांत मोठे टास्क असून त्यासाठी उभय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची फळी सज्ज केली आहे.भाजपचा सर्वाधिक भर नागपूर शहर व जिल्ह्यावर असून कॉंग्रेसने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे.त्यातच,पक्षाचे पोल मॅनेजर्स समोर न येता मतदारांना काढण्यासाठी व्युहरचनेत व्यस्त झाले आहेत.रिंगणात कायम असलेल्यांमध्ये काँग्रेसचे ॲड.अभिजित वंजारी,भाजपचे सुधाकर कोहळे,अतुल देशमुख,मंगेश वानखेडे,भीमसेनेचे श्रीधर साळवे,बळीराजा पक्षाचे सिद्धार्थ निकोसे,अरविंद लिल्लोरे, अशोक लांजेवार,आनंद मेश्राम,उत्तमप्रकाश शहारे, सचिन काळबांडे,सुरेंद्रकुमार खोब्रागडे,गजानन लोखंडे,गीता मेहर,राजकुमार गेडाम,दुर्गावती सरीयाम, प्रा.देवराग नंदनवार,नरेश पिल्ले,नरेंद्र पाटील,नितीन महेश नागदेवते,नितेश कराळे,पराग भोंगाडे,प्रशांत पिंपळे, प्रज्वल गावंडे,ॲड.प्रदीप सोमकुवर,बिपीन तुपे,धनंजय बोरकर,शरद भांडारकर,मनोज मेंढे,मंजील गेडाम,रघुनाथ सोनटक्के,राजेंद्र आत्राम,रोशन साठोणे,विनायक अवचट, सुमेध बौद्ध गडपायले,प्रा.अनिल सोले,ॲड.संदीप शेंडे, संजय धुल यांचा समावेश आहे.
- Advertisement -

