Thursday, October 22, 2026
Homeनागपूरआंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतांनाच सदरचा प्रकार घडला.पथकाने तात्काळ बोटीच्या साहाय्याने त्यांच्या जवळ पोहचून पाण्यात उडी मारली आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.सुर्देश गोरखनाथ वय १६ वर्षे व सिद्धीनाथ गोरखनाथ वय २० वर्षे अशी बचावलेल्या युवकांची नावे असून दोघेही कर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.सध्या नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्साह असल्याने देशभराच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी तसेच इतर नागरिकांनी रेलचेल आहे.अश्यातच कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान,अंबाझरी तलाव येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल येथील एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतांना आंघोळीसाठी दोन युवक तलावात उतरले. युवक बुडत असतांनाच उपस्थित नागरिकांनी बुडाले-बुडाले असल्याचा आवाज केला.त्याचवेळेस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता बोटीच्या साहाय्याने युवकांच्या जवळ पोहचून पाण्यात उडी मारली आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. सिद्धनाथ गोरखनाथ हा शुद्धीत होता,तर सुर्देश गोरखनात यास बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले आणि प्रथमोपचार देऊन त्याला शुद्धीत आणले व रुग्णवाहिका येण्यास वेळ लागल्याने त्यांना खासगी वाहनाने मेओ हॉस्पिटल येथे रवाना केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!