Monday, October 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदाखल्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा; आपले सरकार सेवा केंद्रांची सेवा तात्पुरती बंद..

दाखल्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा; आपले सरकार सेवा केंद्रांची सेवा तात्पुरती बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य शासनाने विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टल विकसित केले आहे.सध्या या पोर्टलचे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने सर्व सेवा या गेल्या शुक्रवारपासून ते उद्या,मंगळवार २० ऑक्टोंबर २०२६ पर्यंत बंद राहणार आहेत.सदरची तारीख अपेक्षित असून गरज पडल्यास कालावधी वाढू शकतो,असे शासनाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे,महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील विविध विभागांची संकेतस्थळे,पोर्टल्स,ॲप्लिकेशन्स आणि नागरिक/व्हीएलई सेवांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा अधिक स्थिर करण्यासाठी,डेटा सेंटरचे स्थलांतर आणि प्रणाली अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.या प्रक्रियेदरम्यान, संबंधित संकेतस्थळे,पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक/व्हीएलई सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.त्यामुळे सदरच्या कालावधीत शासकीय ऑनलाईन कामांसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.त्यातच,पोर्टल बंद असल्याने आपले सरकार केंद्रांमधून दाखल्यांसाठी अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जावरील ऑनलाइन कार्यवाही करणे शक्य होणार नाही.त्यामुळे उत्पन्न,अधिवास यांसारख्या दाखल्यांसाठी या सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या कामांना विलंब होऊ शकतो.दाखल्यांची तातडीने आवश्यकता असलेल्या नागरिकांना सेवा पूर्ववत होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता अनुदानित खतांचे मोबाईलवरून होणार बुकिंग; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये येत्या,गुरुवार २२ ऑक्टोंबर पासून ‘एफएफएस’(फार्मर फर्टिलायझर सिस्टीम)ही डिजिटल...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अटींमध्ये सुधारणा.. -आता पात्र विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी ३८ ते ४३ हजार रुपये अर्थसहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई...

चारचाकी वाहनातुन दारु तस्करी; देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई.. -९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात दारु बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची अवैध दारू पकडली जाते.मात्र,दारूची तस्करी थांबण्याचे नावच घेत नाही.कारण...

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!