- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-आरोग्य विभाग,जिल्हा परिषद भंडारा येथील साथरोग विभागात झालेली बदली रद्द करून जिल्हा प्रशिक्षण केंद्रात ड्युटी करायची असेल,तर २५ हजार रुपयांची लाच मागून भंडारा जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय परिसरातील पोर्चमध्ये तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी भंडारा जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक या दोघांना भंडारा घटक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल मंगळवारी रंगेहाथ अटक केली.डॉ.संजीव ग्यानीराम नैतामे,वय ५४ वर्षे,पद-वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र भंडारा (वर्ग-२),मुळ पत्ता वार्ड क्रमांक-४ पोहरा,ता.लाखनी, जिल्हा-भंडारा, ह.मु.प्लॉट क्रमांक-३०३ रविंद्र मानापूरे यांचे घरी, तिसरा मजला प्रगती कॉलनी भंडारा,
व प्रविण माधव बडवाईक,वय ४८ वर्षे,पद-आरोग्य सहाय्यक जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्र,आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा रा.बंजरग चौक,भंडारा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रकरणातील मुळ तक्रारदार हे ५५ वर्षीय पुरुष असून २९ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रारदार यांची बदली आरोग्य विभाग,जिल्हा परिषद भंडारा येथील साथरोग विभाग येथे झाल्याने त्याच दिवशी कार्यमुक्त करण्याचे पत्र व्हॉट्सॲप वर प्राप्त झाले होते.तक्रारदार यांना साथरोग विभागात काम करण्याची इच्छा नसल्याने बदलीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतली असता तेथे दाद मिळाली नाही.या दरम्यान,प्रविण बडवाईक यांनी तक्रारदार यांना तुला जिल्हा प्रशिक्षण केंद्र,येथेच ड्युटी करायची असेल आणि साथरोग विभाग येथील बदली रद्द करायची असेल तर डॉ.संजीव नैताम,वैद्यकीय अधिकारी यांचे सोबत बोलून आदेश रद्द करतो असे बोलून डॉ.नैताम यांचे करिता २५ हजार रुपये लाचेची मागणी करून प्रथम १५ हजार रुपये व आदेश रद्द झाल्यानंतर १० हजार रुपये अशी लाचेची मागणी केली असल्याची तक्रार सोमवार १२ ऑक्टोंबर २०२६ रोजी भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी जिल्हा प्रशिक्षण केंद्र,सामान्य रुग्णालय भंडारा येथे पडताळणी कारवाई करण्यात आली.पडताळणी कार्यवाही दरम्यान झालेल्या संभाषणावरून दोघांनीही तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवीली व काल, मंगळवार १३ ऑक्टोंबर रोजी भेटण्यास सांगितले. त्यानुसार,एसीबीच्या पथकाने सापळा कारवाई आजमावली असता आरोपींनी तक्रारदार यांचे कडून जिल्हा प्रशिक्षण केंद्र,सामान्य रुग्णालय भंडारा येथील पोर्चमध्ये १५ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडले.या प्रकरणी दोघांनाही अटक करून भंडारा पोलीस ठाण्यात अप.क्र.२१२५/२०२६ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,७ (अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई दिगबंर प्रधान,पोलीस अधीक्षक लाप्रवि नागपूर,विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर,श्रीमती माधुरी बावीस्कर अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी नितेश देशमुख, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा.मो.क. ७५८८२४४२६८, पर्यवेक्षण अधिकारी प्रविणकुमार पाटील,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,भंडारा मो.क्र.७०२०२१२०९२ व सापळा पथकातील प्रविणकुमार पाटील,पोलीस उपअधीक्षक,नितेश देशमुख, पोलीस निरीक्षक,पोलीस हवालदार शिल्पेंद्र मेश्राम, पोलीस अंमलदार प्रतिक उके,मयुर सिंगणजुडे, हितेश हलमारे,विष्णु वरठी आदींनी पार पाडली.
- Advertisement -

