- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी,याकरिता आज,सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने देसाईगंज शहराच्या लाखांदूर टी-पॉईंट येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी,ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेणे,तसेच एसआयआर(SIR) प्रक्रिया रद्द करणे या प्रमुख मागण्या करून घोषणा देण्यात आल्या. एसआयआरच्या माध्यमातून लाखो नागरिक मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नसून ही सत्ताधाऱ्यांची खेळी आहे.त्यामुळे यांची ही खेळी जास्तकाळ टिकणार नाही.यांना जनताच धडा शिकवेल,असे उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन दरम्यान म्हटले. दरम्यान,उपस्थित पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव,’ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले.
या प्रसंगी माजी सभापती परसराम टिकले,काँग्रेस कमिटीचे देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, माजी उपसभापती नितीन राऊत,माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे,काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे,माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम,डॉ.श्रीकांत बन्सोड, विलास ठाकरे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम,माजी सभापती गिरीधर तीतराम,उपसरपंच गजानन सेलोटे,ओबीसी काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरुण कुंभलवार,वाशिम शेख,संदीप वाघाडे,युवक काँग्रेस कमिटी विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर,माजी जिल्हा परिषद सदस्य जयमाला पेंदाम,काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्ष कैलास वानखेडे,परशुराम ठाकरे,शैलेश बगमारे,ऋषी बगमारे, हंसराज लांडगे, दुर्वास नाईक,गजेंद्र नाईक,काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष सुरेश मेश्राम,सुरेश तोंडफोडे,प्रकाश समर्थ, वैष्णवी आकरे,नगरसेविका आशा दहिवले, नगरसेविका मंदा समर्थ,नगरसेविका राधिका पत्रे, नगरसेविका गुरमीतकौर चावला,मनोहर खेकारे,सागर बन्सोड,देवा शहारे,नंदू चावला,दादाजी गावतुरे,विठ्ठल हारगुडे,अथर्व राणे,निलेश दुपारे,देवनाथ सयाम,नरहरी तुमराम,राजकुमार मेश्राम यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -

