- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे आयुक्त,कृषी यांच्या अहवालावरून स्पष्ट करण्यात आले आहे.त्यानुसार,राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.सदर २६५ तालुक्यांमध्ये Trigger-१ म्हणजेच प्रथम कळ लागू झाल्याने तिथे पंचनामे करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी तात्काळ सुरु करावी. सर्व्हेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑडीनेट संकलन करून पिक परिस्थितीचा अहवाल आयुक्त,कृषी यांच्या मार्फत शासनास तात्काळ सादर करण्यात यावा,असे शासनाने निर्देश दिले आहेत.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.या उपाययोजनांमध्ये
१) जमीन महसूलात सूट,२) पिक कर्जाचे पुनर्गठन
३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती
४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट(७.५ हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या विजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे.त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल)
५) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी
६)रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या
शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे
९) शेतीवर आश्रित शेतकरी/मजूर इत्यादी यांना अन्न धान्याची टंचाई होणार नाही,याबाबत व्यवस्था उभी करणे
१०) जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे
११) जलसंधारणाची कामे सुरु करणे
१२) अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे इत्यादींचा समावेश आहे.
- शासन निर्णयातील जिल्हानिहाय यादी खालीलप्रमाणे👇



- Advertisement -

