Saturday, September 26, 2026
Homeनागपूरधक्कादायक..! धावत्या ट्रेनवर दगडफेक; काचांचे तुकडे प्रवाशांच्या जेवणात..

धक्कादायक..! धावत्या ट्रेनवर दगडफेक; काचांचे तुकडे प्रवाशांच्या जेवणात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दगडफेकीत ट्रेनच्या एसी कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटून काचांचे तुकडे थेट प्रवाशांच्या जेवणात पडल्याने एकच खळबळ उडाली.
१२२९० क्रमांकाची दुरंतो एक्सप्रेस ट्रेन काल  शुक्रवारच्या रात्री आठ वाजता नागपूरहून मुंबईसाठी निघाली होती.दरम्यान,बोर्खेडी रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर वर्धा नजीक अज्ञाताने ट्रेनवर दगडफेक केली.या दगडफेकीमध्ये बी-४ डब्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि काचेचे तुकडे थेट प्रवाशांच्या चेहऱ्यावर उडाले.यातील काही तुकडे प्रवाशांच्या जेवणातही पडले.घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपी पथकाने बोर्खेडी-सिंधी दरम्यान शोधमोहीम राबवली.मात्र,संशयित व्यक्ती वा ठोस पुरावा हाती लागला नाही. दगडफेकीनंतर ट्रेन वर्धा स्टेशनवर थांबवण्यात आली आणि रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार दाखल करण्यात आली.या घटनेनंतर,रेल्वेच्या मेकॅनिकल टीमने काच दुरुस्त केल्यावर ट्रेन मुंबईकडे रवाना झाली.प्रकरणी अज्ञाताविरोधात रेल्वे कायद्याच्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुरामुळे ५२५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; आजारी विद्यार्थिनीला एसडीआरएफच्या मदतीने उपचारासाठी हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-लगतच्या छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत जिल्हा प्रशासनाने ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.ही कार्यवाही काल शुक्रवारच्या दुपारपासून...

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!