Tuesday, September 22, 2026
Homeनागपूरपठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७०...

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी उतरविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..अश्याच प्रकारची घटना नागपूर-अमरावती मार्गावरील वाडी परिसरातील आठवा मैल येथील आठवडी बाजाराजवळ उघडकीस आली आहे.एका पठ्ठ्याने अवैध आणि बनावट दारूची वाहतूक करण्यास दिमाक लावला खरी,पण तो अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.ट्रकमध्ये वरून भंगार म्हणजेच टिन-टप्पर भरला आणि त्याच्या खाली तब्बल ३९० खोके बनावट देशी दारूच्या बॉटल ठेवल्या.प्रत्येक खोक्यात ९० मिलीच्या शंभर बॉटल म्हणजेच तब्बल ३९ हजार देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या.प्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने दारूचा साठा,इतर साहित्य आणि ट्रक असा एकूण २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.अब्दुल तौसिफ अब्दुल हफीज वय ३४,रा. गवळीपुरा,गिट्टीखदान,नागपूर असे अटकेतील आरोपी ट्रक चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्राथमिक तपासणीत सदरची देशी दारू ही बनावट असल्याचे स्पष्ट झाले.यातील धक्कादायक बाब म्हणजे,बनावट देशी दारूचा साठा हा नागपूरवरून गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे नेण्यात येणार होता.ही कारवाई काल रविवारी नागपूर-अमरावती मार्गावरील आठवा मैल परिसरातील आठवडी बाजाराजवळ करण्यात आली.चौकशीत आरोपी चालकाने सदरचा साठा हा अंकुश ऊर्फ अन्ना सुधाकर कुंचनवार वय ३८ वर्षे,रा.यशवंतनगर,हिंगणघाट,वर्धा याच्या सांगण्यावरून धुळे येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले.या प्रकरणी अंकुश कुंचनवारचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.महत्वाचे म्हणजे,सदरच्या कारवाईवरून गडचिरोली जिल्ह्यातील तळीराम हे असली दारू म्हणून नकली दारू पीत असल्याचे स्पष्ट होत आहे.यापूर्वीही अश्याच प्रकारे अवैध नकली दारू
पुरविण्यात आली असावी,असा संशय बळावला आहे.
त्यातच,दारू सापडली म्हणून माहीत पडले,नाहीतर परिसरात मोठा झिंगाट झाला असता.लांब दूरवरून अवैध दारूची मोठी खेप गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत असल्याने जिल्ह्यातील दारूबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!