Saturday, September 12, 2026
Homeमुंबईविवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा रचून लिपिकास २ हजार रुपये घेतांना रंगेहाथ पकडले. स्वप्नील गोविंद म्हात्रे,लिपिक,आरोग्य खाते,के/पश्चिम वॉर्ड,अंधेरी,महानगरपालिका,मुंबई असे लाचखोर लीपिकाचे नाव असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं.२६/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
प्रकरणातील तक्रारदार २४ वर्षीय तरुण असून त्यांच्या विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खाते,के/पश्चिम वॉर्ड,म.न. पा.,मुंबई येथील लोकसेवक स्वप्नील म्हात्रे, लिपीक यांनी तक्रारदार यांचेकडे चार दिवसांपूर्वी म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी शासकीय फी व्यतिरिक्त १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी ८ सप्टेंबर रोजी मुंबईच्या लाच प्रतिबंध विभागात तक्रार दाखल केली.त्यानुसार,प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ८ सप्टेंबरला पथकाने पडताळणी केली असता,लिपिक स्वप्नील म्हात्रे यांनी तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर,९ सप्टेंबरला सापळा रचण्यात आला व सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक स्वप्नील म्हात्रे यांना तक्रारादार यांच्याकडून २ हजार रुपये लाच स्विकारतांना के/पश्चिम वॉर्डच्या आरोग्य खात्याच्या ऑफिसमध्येच रंगेहाथ पकडण्यात आले.याप्रकरणी लीपिकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
  • सदरची कारवाई :-
सापळा अधिकारी-श्रीमती रेखा काळे, पोलीस निरीक्षक,मो.नं.९२२६८५८०३५
पर्यवेक्षक अधिकारी- हरिदास किल्लेदार,सहाय्यक पोलीस आयुक्त,मो.नं.९८२१११६८६४.
सापळा पथक- पो.ह.०१७८५/चव्हाण २) पो.ह. ०४०३९०/गायकवाड ३) म.पो.ह.०४११३०/ तोडणकर ४) पो.शि.१८१२४२/राणे ५)म.पो.शि. ०९१०८०/नलावडे ६)पो.शि. ०९२९४८/गायकवाड
७) पो.ह.चा. ०७००९९/पुरळकर ८) पो.ह.चा. ०७१६५६/देसाई
मार्गदर्शन- संदिप दिवाण,अप्पर पोलीस आयुक्त, ला.प्र.वि.,मुंबई २)अनिल घेरडीकर,अप्पर पोलीस उप आयुक्त(१),ला.प्र.वि.,मुंबई,मो.नं. ७७९६५९११००
३)अनंत साळुंखे,अप्पर पोलीस उप आयुक्त(२), ला.प्र.वि.,मुंबई, मो.नं. ८२७५१८८११९
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!