Tuesday, September 8, 2026
Homeनागपूरमॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.विशेष म्हणजे,विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात नोंदवली गेली आहे.येथे ३५.१ अंशांची नोंद करण्यात आली आहे; तर नागपूरच्या कमाल तापमानात साडेतीन अंशांची वाढ झाली. नागपूरचे तापमान ३३.४ अंश असून सध्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट नसल्याने हवामान कोरडे राहून तापमानात वाढ होणे आहे.उद्याला केवळ गडचिरोली जिल्ह्यासाठी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि मॉन्सून ट्रफ कमजोर झाल्यामुळे अनेक भागांतून ढगांची दाटी कमी झाली असून,पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.’एल निनो’ प्रभावामुळे
यंदाचा ऑगस्ट महिना कोरडा गेला.सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने उन्हाळ्यासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात पाऊस ओसरल्यामुळे थेट सूर्यप्रकाश पडेल आणि कमाल तापमानात वाढ होईल.पावसाच्या विश्रांतीमुळे हवेतील आर्द्रता आणि वाढलेले तापमान यांमुळे नागरिकांना उष्ण व दमट वातावरणाचा त्रास जाणवू शकतो.त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!