Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर वेगाने वाढून थेट ६० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.काही दिवसांपूर्वी अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध असणारा कांदा अचानक महाग झाल्याने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गृहिणींचे महिन्याचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.स्थानिक बाजारात सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.विशेष म्हणजे, भाजी,पोहे,उपमा,उसळ,मिसळ,चटणी यांसारख्या विविध खाद्यपदार्थांमध्ये कांद्याशिवाय स्वयंपाकाची चवच पूर्ण होत नाही.अश्यातच ६० रुपयांपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दराचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे.कांद्याच्या या भडकलेल्या किंमतींमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींवरही मोठा परिणाम झाला आहे.पूर्वी जे ग्राहक बाजारातून एकत्रच दोन ते तीन किलो कांदा खरेदी करत होते; ते आता महागाईमुळे केवळ गरजेपुरताच कांदा खरेदी करतांना दिसत आहेत.मागणी आणि पुरवठ्यातील या विसंगतीमुळे कांद्याचे दर वधारले आहेत.मात्र,वाढलेल्या दराचा फायदा रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या शेतकरी बांधवांना खरोखरच होत असेल काय? याचा विचार करणे गरजेचे आहे.त्यातच,बाजारात नवीन मालाची आवक जोपर्यंत होत नाही; तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची दाट शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!