- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना ताजी असतांनाच आता हिंगोली जिल्हा पोलिस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय)यांनी आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याने हिंगोली पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल विठ्ठलराव गंगलवाड वय ५० वर्षे ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.विशेष म्हणजे,घटनेवेळी गंगलवाड हे वर्दितच होते.आज शनिवारच्या सकाळी साडे आठच्या दरम्यान हिंगोली शहराच्या खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे रुळावर सदरचा प्रकार घडला.अमोल गंगलवाड हे पूर्णा येथून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत उभे होते.रेल्वे जवळ येताच त्यांनी अचानक धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली.या घटनेत
पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने तात्काळ हिंगोली रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली.त्यानंतर शहर पोलिसांना याविषयी कळवण्यात आले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर,सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपककुमार मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के व पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी अमोल गंगलवाड यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.मृतक गंगलवाड हे दोन महिन्यांपूर्वीच परभणी येथून बदली होऊन हिंगोली जिल्हा पोलिस दलात रुजू झाले होते आणि आज त्यांनी जीवनयात्रा संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

