Thursday, August 27, 2026
Homeगोंदियाआरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)७ हजार रुपयांची लाच मागणी करणारा व त्यास प्रोत्साहन देणाऱ्यास रंगेहाथ पकडले.मारोती यादव दिपेवाड वय-३९ वर्षे,पद-आरोग्य सेवक,जिल्हा हिवताप कार्यालय गोंदिया, वर्ग-३,रा.पारधी हॉउस न्यु लक्ष्मीनगर बाहेकर नर्सिंग होम जवळ गोंदिया ता.जि.गोंदिया,मुळ पत्ता रा.हरडफ,ता.माहुर,जि.नांदेड व निरजकुमार नरेश अग्रवाल वय-४० वर्षे,पद-वरिष्ठ लिपीक,जिल्हा हिवताप कार्यालय गोदिया,वर्ग-३,रा.अंगुर बगिचा रोड,मारोती अपार्टमेंट गोंदिया,ता.जि.गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत.
४३ वर्षीय पुरुष तक्रारदार यांचे वडील हे जिल्हा हिवताप विभागातुन आरोग्य सेवक या पदावरुन नियमित वयोमानाने सन-२०१६ मध्ये सेवानिवृत्त होउन फेब्रुवारी-२०२६ मध्ये मरण पावले आहेत.वडिलांचे मृत्यु नंतर तक्रारदार हे त्यांचे आई सोबत कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत माहिती विचारण्याकरीता मार्च-२०२६ मध्ये जिल्हा हिवताप कार्यालय,गोंदिया येथे गेले असता वरिष्ठ लिपीक निरजकुमार अग्रवाल यांनी तक्रारदार यांना तुमच्या वडिलांचा नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल देखील आहे,ते काढून देतो.त्यासाठी ६ हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगीतले.त्यानंतर,तक्रारदार परत त्यांच्या वडीलांचे नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे बिल निघाले नसल्यामुळे जुन-२०२६ मध्ये आरोपी निरजकुमार अग्रवाल यांना भेटण्यास गेले असता त्यांनी त्यांचे कार्यालयातील आरोग्य सेवक मारोती दिपेवाड यांना भेटण्यास सांगितले.तक्रारदार दिपेवाड यांना भेटले असता त्यांनी सुध्दा तक्रारदार यांना नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढुन देण्याकरीता ७ हजार रुपये लाचेची मागणी केली.त्यानंतर,२१ ऑगस्ट रोजी तक्रारदार यांनी दिपेवाड यांना एरियस बिल बाबत पुन्हा विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांना ७ हजार रुपये द्यावे लागतील,असे म्हणुन लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली.त्यानुसार,२४ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदार यांना पंच व डिजीटल व्हाइस रेकॉर्डर सह आरोपी मारोती  दिपेवाड व आरोपी निरजकुमार अग्रवाल यांच्याकडे जिल्हा हिवताप कार्यालय येथे लाच मागणी पडताळणी कामी पाठवले असता दिपेवाड यांनी तक्रारदार यांच्या वडीलांचे नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे बिलाचे एरियस काढून देण्याकरीता ७ हजार रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.तसेच आरोपी निरजकुमार अग्रवाल यांनी त्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर काही वेळातच सापळा कारवाई करण्यात आली आणि मारोती दिपेवाड यांना पांचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.त्यातच प्रोत्साहन देणारे अग्रवाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली.दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनीयम १९८८(सुधारणा २०१८) अन्वये पोलीस स्टेशन केशोरी,जि.गोंदिया अप.क्र.६९१/२६ कलम ७,१२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला व काल मंगळवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो.क्र.९९२३१८५५६६,माधुरी बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र.७०३८४३६४४१,विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र. ९९२३१४२५६९ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अरंविद राऊत, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि गोंदिया,पर्यवेक्षक अधिकारी निलेश लोधी,पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि गोंदिया, सापळा पथक निलेश लोधी,पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि गोंदिया,पो.नि.अरंविद राऊत,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि गोंदिया,पो. नि.उमाकांत उगले,स.फौ.चंद्रकांत करपे,पो.हवा. संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर, अशोक कापसे,संतोष शेंडे,संतोष बोपचे,कैलाश काटकर,प्रशांत सोनवाने,मपोना रोहीणी डांगे,संगिता पटले,चालक पोना दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने सापळा कारवाई पार पाडली.
  • नागरीकांना आवाहान👇
भ्रष्टाचारासंबधी काही माहिती अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुध्द तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी खालील नमुद केल्याप्रमाणे संपर्क साधावा.
  • गोंदिया घटक कार्यालय👇
गोंदिया तिरोडा रिंग रोड,रेल्वे चौकी जवळ,ता.जि. गोंदिया पिन कोड-४४१६१४,
दुरध्वनी क्रमांक-०७१८२-२५१२०३
व्हॉटसअप क्रमांक-९२०९०४१०६४
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!