Saturday, August 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम...

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा आज,शनिवार २२ ऑगस्ट रोजी ५७ वा वाढदिवस हा त्यांच्या कार्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्याचा दिवस आहे.
साधी राहणी,उच्च विचार आणि सर्वसामान्य माणसाशी जुळलेली नाळ ही आमदार रामदास मसराम यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. मोठेपणाचा कोणताही आव न आणता सामान्य माणसांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे,हीच त्यांच्या कार्यपद्धतीची खरी ओळख आहे.
दीर्घकाळ शिक्षकी पेशात कार्यरत राहून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली.शिक्षक म्हणून ज्ञानदान करतांना समाजातील विविध घटकांशी त्यांचा जवळून संपर्क आला.ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबांच्या समस्या,विद्यार्थ्यांच्या अडचणी,शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न यांची जाणीव त्यांना या प्रवासातून अधिक व्यापकपणे झाली.शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही समाजापासून दूर न जाता त्यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला आणि सार्वजनिक जीवनात सक्रियपणे पाऊल ठेवले.
समाजातील प्रश्न केवळ चर्चेत राहू नयेत,तर त्यावर शासनाच्या पातळीवर निर्णय झाले पाहिजेत,या भूमिकेतून त्यांनी राजकारणाकडे पाहिले.जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ यांच्या जोरावर त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि अखेर आमदार म्हणून विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली.
आमदार झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला तो सामान्य माणूस.आरोग्य,शिक्षण,रस्ते,वीज,पाणी,शेती, वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान, आदिवासी व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला. विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
आरोग्यसेवेला दिलेले प्राधान्य त्यांच्या लोकाभिमुख कार्याची विशेष ओळख ठरते.ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात,गरीब व गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत मिळावी आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.आरोग्य तपासणी शिबिरे,चष्मे वाटप शिबिरे आणि गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते.
विधानसभेच्या पटलावर प्रश्न मांडणे हे केवळ लोकप्रतिनिधीचे कर्तव्य नसून,जनतेच्या अपेक्षांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आहे,या भावनेने त्यांनी विविध प्रश्न मांडले.आपल्या मतदारसंघातील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून संबंधित विभागांचा आढावा घेणे,अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणे आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करणे,हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
शेतकरी,आदिवासी,विद्यार्थी,महिला,कामगार, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिक यांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका सातत्याने संवेदनशील राहिली आहे.वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,ग्रामीण भागातील रस्ते व पूल दर्जेदार व्हावेत,वीज व पाणीपुरवठ्याच्या समस्या दूर व्हाव्यात, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात,अशा विविध विषयांसाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन आहे,हा विचार त्यांच्या सार्वजनिक जीवनातून अधोरेखित होतो.साधेपणा जपत,सर्वसामान्यांमध्ये राहून आणि लोकांच्या अडचणींना स्वतःच्या समस्या समजून त्यावर काम करण्याची त्यांची पद्धत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी ओळख देते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या सामाजिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करतांना,आगामी काळातही त्यांच्या हातून जनतेच्या हिताची अनेक विकासकामे घडावीत, ग्रामीण व दुर्गम भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचावीत,हीच अपेक्षा.
शिक्षक ते समाजसेवक,समाजसेवक ते लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी ते जनतेच्या प्रश्नांचा बुलंद आवाज-हा आमदार रामदास मसराम यांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रेरणादायी प्रवास आहे.
  • सागर वाढई-एक सच्चा निष्ठावंत मावळा👇
आमदार रामदास मसराम सर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
त्यांना उत्तम आरोग्य,दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो,हीच सदिच्छा!
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.रामदासजी मसराम सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐 🎉शुभेच्छुक -आमदार रामदास मसराम मित्र परिवार

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.रामदासजी मसराम सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐 🎉शुभेच्छुक - आमदार रामदास मसराम मित्र परिवार

भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी.. -३० हजार घेतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ३३ वर्षीय इसमास पोलीस हवालदाराने दम देत परिसरात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर ३५...

पूरबाधित ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात  जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज शुक्रवारी वाटप...

रक्तदानातून आमदार रामदास मसराम यांना ५७ व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.. – आज ५७ रक्तदात्यांचे रक्तदान; मिसार दाम्पत्य ठरले प्रेरणादायी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या उद्या,शनिवार २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!