Monday, August 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसाखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार सोमवार या श्रावण महिन्यात असणार आहेत.विशेष म्हणजे,श्रावण महिना सुरू झाला की,खऱ्या अर्थाने सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते.सणासुदीचे दिवस म्हटले की गोडधोड पदार्थाची चांगलीच चंगळ असते.या महिन्यात आठ-दहा दिवसांच्या अंतराने सण असतात. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला कोणते ना कोणते नैवेद्याच्या निमित्ताने घरी पंचपक्वान्न तयार केले जातात.त्यातच, एक-दोन गोड पदार्थही केले जातात.यासाठी साखरेला अधिक प्रमाणात मागणी असते.यामुळे साखरेचे दरही वाढत असतात.पण,यंदा मात्र साखरेच्या दराने उच्चांक गाठत सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावून ‘गोडवा झाला कडू’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.गेल्या पाच वर्षात साखरेच्या किरकोळ दरात प्रति किलो तब्बल २५ रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींचे घरगुती बजेट विस्कळीत झाले आहे.सन २०२१ मध्ये साखरेचे किरकोळ दर प्रति किलो ३४ ते ३७ रुपये होते.आता हेच दर ५५ ते ५८ रुपयांवर पोहोचले असल्याने सणासुदीला लाडू,शिरा,पुरणपोळी,खीर यांसारखे गोड पदार्थ तयार करतांना आता खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.महत्वाचे म्हणजे, साखरेसोबत इतरही खाद्यपर्थाच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट पूर्णता कोलमडले आहे.अश्यातच घर खर्चातील प्रत्येक रुपयाचा हिशेब सांभाळतांना साखरेच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम जाणवत आहे.सणासुदीच्या काळात किराणा मालाच्या खर्चात वाढ होत असल्याने शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

सिंदेवाहीच्या विकासातील योगदानाबद्दल उपविभागीय अभियंता षटगोपमावार यांचा गौरव.. – मित्र परिवार व नागरिक मंचचा स्तुत्य उपक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर सिंदेवाही येथील मित्र परिवार व नागरिक मंचच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता षटगोपमावार यांचा विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!