Monday, August 10, 2026
Homeपुणेधावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली होती.घटनेनंतर विमान कोसळल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसारित करण्यात आल्या होत्या.मात्र,राज्याच्या
उपमुख्यमंत्री तथा बारामतीच्या आमदार सुनेत्रा पवार यांनी विमान कोसळल्याच्या बातम्यांना पूर्ण विराम दिला आहे.विमान प्रत्यक्षात कोसळलेले नसून,त्याने आकाशात उड्डाणही केले नव्हते.विमान केवळ धावपट्टीवर होते आणि वळण घेत असतांना त्याचे एक चाक बाजूला अडकले.या पलीकडे कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नसून,सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी  स्पष्ट केले.विशेष म्हणजे, ट्रेनर विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोइफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे होते.दोघेही सुरक्षित असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.महत्वाचे म्हणजे,आज घडलेल्या बारामतीतील घटनेमुळे याचवर्षी २८ जानेवारी रोजी घडलेल्या एका अत्यंत भीषण आणि दुर्दैवी विमान अपघाताच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.या अपघातात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!