Tuesday, September 22, 2026
Homeनागपूरमहामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.महामार्गाच्या विस्ताराला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा दावाही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन मोजणी केली जात असून पोलिस बळाचा वापर होत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत.सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये,अशी मागणी त्यांनी केली.काही मोजक्या कंत्राटदार आणि उद्योगसमूहांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प राबविला जात असेल,तर तो जनहिताचा विकास ठरू शकत नाही.सरकारने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,असाही इशारा वडेट्टीवार यांनी दिला.त्याचबरोबर,देशाच्या भविष्यासाठी जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांना देशद्रोही ठरवणे दुर्दैवी असल्याची खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.नाशिक कुंभमेळ्यासाठी स्थानिक विकासाकडे दुर्लक्ष करून सुरू कंत्राटी व्यवस्थेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ठराविक कंत्राटदारांना कामे दिल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.कुंभमेळ्याच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप करत किमान रस्त्यांची कामे तरी दर्जेदार करावी,अशी मागणी त्यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!