Wednesday, September 9, 2026
Homeनागपूरअज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील रामटेक तालुक्याच्या पवनी शिवारात घडली.पवनी परिसरातील नागपूर-जबलपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.विशेष म्हणजे,जंगलात वाघ,बिबट यासह इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे.दरम्यान,काल मंगळवारी एक बिबट रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरात धडक दिली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.यात बिबट्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बिबट जखमी अवस्थेत मार्गावरच पडून राहिला.दरम्यान,काहींनी
याबाबतची माहिती शिवारातील टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांना दिली.त्यांनी लगेच वनविभागाला कळविले. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. सदरचा बिबट नर असून,डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.पंचनाम्यानंतर वनविभागाच्या पथकाने मृत बिबट्याची विल्हेवाट लावली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!