Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीपालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू स्वस्त धान्य दुकानातून काही कालावधीसाठी बंद झाल्याने मक्याचे करायचे काय?पोळी खायला गहू द्या न..! अशी आर्त हाक जिल्ह्यातील रेशनकार्डधारक लाभार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिली आहे.विशेष म्हणजे,राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यावर त्यांची विशेष कृपा आहे.जिल्ह्यात विविध प्रोजेक्ट,आरोग्य सेवा,विद्यार्थी वर्ग,शेतकरी,बेरोजगारी, अडी अडचणी व इतर अन्य विकासात्मक कामांचा धूमधडाका सुरू करण्यात आला आहे.मात्र,दैनंदिन आहारात वापरला जाणारा गहू सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून अचानकपणे गायब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आणि अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आहारात प्रामुख्याने गहू व तांदळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.बहुतांश नागरिक मक्याचा वापर नियमितपणे करत नसल्याने शासनाकडून मिळणाऱ्या या मक्याचे करायचे काय? असा सवाल उपस्थित करत अनेक लाभार्थ्यांनी मका घेण्यास नकार दर्शवून थेट विक्री करण्याचा सपाटा चालवला आहे.आम्हाला नेहमीच्या आहारासाठी गहू व तांदूळच उपलब्ध करून द्या,अशी मागणी केली जात आहे.विशेषतः स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य हे प्रत्यक्षात नागरिकांच्या गरजेनुसार असावे,अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा जरी असली तरीही शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीचा मूळ उद्देशच गरजूंना त्यांच्या गरजेनुसार अन्नधान्य उपलब्ध करून देणे आहे.त्यामुळे लाभार्थ्यांची ही रास्त मागणी लक्षात घेता,मक्याऐवजी गहू वितरित करण्यात यावा,अशी मागणी रेशनकार्डधारक लाभार्थ्यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!