Friday, October 23, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय..आम्ही करतो तक्रार; खिसे त्यांचे गरम होतात...!

संपादकीय..आम्ही करतो तक्रार; खिसे त्यांचे गरम होतात…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादक/ सत्यवान रामटेके 

उद्रेक न्युज वृत्त :- एखादेवेळी काही प्रकरणे सार्वजनिक हिताची म्हणून उघड करावी लागतातच; मात्र काही प्रकरणातील सार्वजनिक हित जोपासून भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडण्याचा कितीही प्रयत्न जरी केला; तरी केलेले प्रयत्न असफल ठरतात.याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही तक्रार करायची आणि ज्यांच्याकडे तक्रार केली जाते; त्यांचे खिसे गरम होतांना दिसून येतात.नकळत खिसे गरम झालेले एवढ्यावरच थांबत नाही तर पलटी होऊन घडलेल्या प्रकरणाची जणूकाही अशांना कल्पनाच नसते; असे भासवित असल्याने शेवटी तक्रार कर्ते हताश होऊन ‘जाऊ द्या नं..! आमच्या बापाचा काय जातोय? असे म्हणून गप्प बसतात.

मुख्यत्वे गप्प बसणाऱ्या व्यक्तींवर समाज माध्यमातून अनेक ठिकाणांहून टीका-टीप्पणी केली जाते.काही ठिकाणी चक्क तक्रार कर्त्यावरच आरोप लावले जातात.तक्रार कर्ता गप्प बसला म्हणजे ‘त्याची सेटिंग झाली असावी’, ‘ हे पैशासाठीच करतात ‘ अशी अनेक टीका-टिप्पणी करून सर्वजण मोकळे होतात.मात्र खरी परिस्थिती वेगळीच असते.ज्यांचे खिसे गरम केले जातात त्यांनाही वाटते की,सगळे काही आमच्याच हातात आहे; असे म्हणून भ्रष्टाचाऱ्यांची बाजू घेऊन थातुर-मातुर चौकशी करून प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न करीत असतात.

खरे म्हणजे समोरील व्यक्तीने आपली बाजू उत्कृष्ट व सबळ रहावी; याकरिता कितीही खिसे गरम केले वा आपला कितीही बोलबाला करून अनेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न जरी केला; तरीही असा व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून कधीही सुटूच शकत नाही.आज ना उद्या भांडाफोड होणारच.आजच्या स्थितीत ‘ पैसा करे,कैसा’ असे जरी असले तरीही सर्वच ठिकाणी पैसाच काम करतो असेही नाही व सर्वच भ्रष्ट असतात असे म्हणता येणारही नाही; काहीजण याला अपवाद सुध्दा आहेत.ज्यांचे खिसे गरम केले गेले आहेत; अशांनी भ्रमात जाऊ नये; एक ना एक दिवस ‘अती तिथे माती’ झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!