- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघालेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन ट्रॅव्हल्समधील तब्बल १५ जण गंभीर जखमी झाले,तर १२ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज,सोमवार ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्याजवळ घडली. विशेष म्हणजे,एका खाजगी ट्रॅव्हल्सने समोर जाणाऱ्या अज्ञात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली.अपघातामध्ये नागपूर,पुणे, खापरखेडा आणि इतर भागांतील प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींमध्ये यश बैनलवार(नागपूर),पुरुषोत्तम शिवाजी भिमान(चंद्रपूर),मधू अनिल तैलानी(नागपूर),
अरुणा दिनेश महोरे(नागपूर),अनिल तोमल तैलानी (नागपूर),अमोल मधुकर साळुंके(नागपूर),शुभम सावळाराम सिरसाट(बीड),नाझ झैब हुसेन(
नागपूर),अस्का झैब हुसेन(नागपूर),सक्षम खोरगडे (खापरखेडा),युविका खोरगडे(खापरखेडा)
चांदणी खमाने(नागपूर),सुरज लक्ष्मण मोरे(नागपूर), विलासू भगवान काके(पुणे),प्रांजली प्रमोद लुटे(नागपूर), संभाजी राजाराम वाळूज(चालक)(अहिल्यानगर),प्रकाश भास्कर कपागार (अहिल्यानगर),चंद्रशेखर रामकृष्ण शिंदे(नागपूर),प्रणाली उमेश खोरगडे(खापरखेडा),अभय श्याम पवनिकार(पुणे),आमरा झैब हुसेन(नागपूर),
सुमन रॉय(नागपूर),शुभांगी सचिन बेनवाल(नागपूर),
रितेश प्रल्हाद किंकरे(बुलढाणा),प्रथा सुनील शर्मा (नागपूर),वंदना चंद्रशेखर शेंद्रे(नागपूर),प्रदिप जी.तागे(नागपूर)इत्यादी जखमी प्रवाशांची नावे आहेत.
आज पहाटेच्या सुमारास एमएच ३१ एफसी ७४६८ क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन पुणे येथून नागपूरच्या दिशेने जात होती.ट्रॅव्हल्समध्ये एकूण २७ प्रवासी प्रवास करीत होते.अश्यातच समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर चॅनल नंबर २७८.८०० वरील मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि
ट्रॅव्हल्सच्या पुढे धावत असलेल्या एका अज्ञात ट्रकला पाठीमागून धडकली.अपघाताची भीषणता जोरदार असल्याने ट्रॅव्हल्सचा समोरील भाग पूर्ण चेंदामेंदा झाला.अपघात घडताच अज्ञात ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्र फर्दापूरचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद तिरणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार,उपनिरीक्षक कांचन जारवाल पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची भीषणता लक्षात घेता तातडीने रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले.सर्व जखमींना तात्काळ मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे आणि मेडिकल ऑफिसर डॉ.गुणवंत शेळके यांच्या देखरेखीखाली डॉ.स्वप्नील सुसर,डॉ.वैभव बोराडे,डॉ.यासीन शाह,डॉ.आदिल खान,डॉ.गणेश शेळके यांचेसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार केले.अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला लावून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत केली.प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस प्रशासन करीत आहेत.
- Advertisement -

