Wednesday, September 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी.. - अटकेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची...

पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी.. – अटकेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करता येणार नाही- उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही प्रकरणांमध्ये पोलीस कारवाईच्या नावाखाली कायदेशीर मर्यादा ओलंडतांना दिसून येतात.स्वतःची बढाई वा आम्ही किती कठोर कारवाई करतो,यासाठी एखाद्या गुन्हेगाराची धिंड काढून मोठा गाजावाजा करीत असतात.पण,पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी.अटकेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करता येणार नाही.कोणत्याही आरोपीचा सार्वजनिक छळ किंवा अपमान केला जाऊ शकत नाही.एखादा व्यक्ती गुन्हेगार असल्याचा आरोप असला,तरी त्याचे मूलभूत हक्क संपत नाहीत,असे कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉयसेन गुप्ता आणि न्यायमूर्ती मीता दास यांच्या खंडपीठाने राज्य सरकारसह गृह विभागाला फटकारले.विशेष म्हणजे,एका प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर मर्यादा ओलांडून आरोपींच्या कमरेला दोरी बांधून त्यांना जाहीरपणे रस्त्यावरून फिरवण्याच्या पोलिसांच्या कथित पद्धतीवर न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता म्हणाले,पोलीस आरोपींना अटक करू शकतात आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.ते दोषी आढळले,तर न्यायालय त्यांना फाशीची शिक्षाही देऊ शकते.परंतु,अटकेच्या नावाखाली पोलीस जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मान आणि मानवाधिकार पायदळी तुडवू शकत नाहीत.या प्रकरणी खंडपीठाने राज्य सरकारला पुढील तीन आठवड्यांत सविस्तर लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.पोलिसांनी नेमक्या कोणत्या परिस्थितीत किंवा कोणाच्या आदेशावरून कायदा हातात घेऊन आरोपींच्या कमरेला दोरी बांधली आणि त्यांना जाहीरपणे फिरवले, याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रात द्यावे लागणार आहे. त्यातच,राज्य सरकारला गुन्हेगारांना अटक करण्याचा आणि त्यांच्यावर खटला चालवण्याचा पूर्ण अधिकार आहे; परंतु त्यांना अपमानित करण्याचा अधिकार नाही. कारवाई करण्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करता येणार नाही;  असेही न्यायलयाने नमूद केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुपारीच स्टेटमेंट दिला अन् सायंकाळीच निलंबनाचा आदेश धडकला.. – गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना...

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली...

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!