Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीशासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू.. - शालेय,कनिष्ठ महाविद्यालयीन व विविध...

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू.. – शालेय,कनिष्ठ महाविद्यालयीन व विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील शाळा,कनिष्ठ महाविद्यालये,वरिष्ठ महाविद्यालये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन,शैक्षणिक वातावरण व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आधार मिळावा,या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयात जमा करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह,रामनगर,गडचिरोली, २.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह,विसापूर रोड,गडचिरोली,३.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह(गुणवंत),गडचिरोली, ४.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, वांगेपल्ली-अहेरी, अहेरी,५.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह,आरमोरी, ६.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह,नवेगाव आणि ७.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह,चामोर्शी या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश उपलब्ध असून शालेय,कनिष्ठ महाविद्यालयीन व विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त,डॉ.सचिन मडावी यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन लवकरात लवकर अर्ज सादर करावेत,असे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!