Wednesday, July 22, 2026
Homeसिंदेवाहीशेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, रविवार ३१ मे रोजी उघडकीस आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली.
चारगाव(बुज.)येथील शेतकरी पांडुरंग गोविंदा गजभिये यांच्या गट क्रमांक ५१ मधील शेतात कठडा नसलेल्या सिमेंट बांधकामाच्या विहिरीत अंदाजे २५ ते ३० फूट पाणी साचलेले होते.या पाण्यात एक वाघ मृतावस्थेत तरंगताना आढळून आला.सदरची माहिती आज सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास वनविभागाला प्राप्त झाली. त्यानुसार,सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार(बोरावार),क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले,वनरक्षक एस.बी.चौधरी तसेच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वनविभागाच्या प्राथमिक तपासणीत संबंधित वाघ हा अंदाजे ७ ते ८ वर्षे वयोगटातील नर वाघ असल्याचे निष्पन्न झाले.नायलॉन दोर व वाघरीच्या सहाय्याने वाघाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे निदर्शनास आले असून कोणत्याही प्रकारच्या शिकारीची किंवा अवयव चोरीची चिन्हे आढळून आली नाहीत.घटनास्थळी उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी एस.आर.,सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे.,राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण(NTCA)चे प्रतिनिधी बंडू धोत्रे तसेच स्वॅब नेचर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प(TATR)चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे,पशुधन विकास अधिकारी डॉ.विनोद सुर्यवंशी आणि पशुधन विकास अधिकारी बजरंग सावरे यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.
प्राथमिक निष्कर्षानुसार,विहिरीतील पाण्यात पडल्याने बुडून वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचनामा,शवविच्छेदन व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वनाधिकारी,ग्रामपंचायत प्रतिनिधी व पंचांच्या उपस्थितीत मृत वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास व कार्यवाही ब्रम्हपुरी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही वनपरिक्षेत्रामार्फत सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सिंदेवाहीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’चे आयोजन.. – महसुली तक्रारींचा तातडीने होणार निपटारा; नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महसुली विषयक तक्रारींचे तातडीने...

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, बुधवार २२ जुलै रोजी ५६ वा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार...

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!