Monday, July 13, 2026
Homeनागपूरवाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची बालविवाहाच्या जोखडातून सुरक्षितरित्या सुटका केल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात उघडकीस आली.पथकाने संबंधित गावात जाऊन विवाह रोखण्याचा प्रयत्न केला असता नातेवाइकांनी ‘फक्त वाढदिवसाचा कार्यक्रम आहे,’ असा बनाव  केला.मात्र,सखोल पडताळणीत घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे उघड झाले.स्वतः पीडित मुलीनेही नातेवाइकांच्या दबावामुळे हा विवाह होत असल्याचे जबाबात सांगितल्याने पोलिसांनी मुलीला सुरक्षित रेस्क्यू करून पुढील संरक्षण व समुपदेशनासाठी बालगृहात दाखल केले.विशेष म्हणजे,बाल संरक्षण समितीकडून कारवाई सुरू असतांना,गावातील एका स्वयंघोषित समाजसेविकेने यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी तात्काळ रामटेकचे तहसीलदार रमेश कोडापे यांच्याशी संपर्क साधून शासकीय यंत्रणा मिळवली व पुढील प्रक्रिया पार पाडली.सदरची कारवाई जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण,प्रसेनजित गायकवाड,साधना ठोंबरे, अनिकेत भिवगडे,मीनाक्षी धडाडे,प्रियंका होटे,पोलीस उपनिरीक्षक वर्षा गायकवाड,सरपंच वर्षा हट्टी,ग्राम अधिकारी करुणा महाले,पोलिस पाटील वैशाली सलामे व अंगणवाडी सेविका विजया कश्यप यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!