Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

उद्याला गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने उद्या,शनिवार ९ मे रोजी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून तडजोडपात्र प्रकरणे जलद,सुलभ आणि सामोपचाराने निकाली काढण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे,मोटार अपघात नुकसान भरपाई दावे,कौटुंबिक वाद(घटस्फोट वगळून), भूसंपादनाशी संबंधित प्रकरणे,बँक कर्ज वसुली प्रकरणे,वीज देयके व पाणीपट्टी वाद तसेच धनादेश अनादर प्रकरणे (चेक बाऊन्स-कलम १३८) सामोपचाराने निकाली काढण्यात येणार आहेत. याशिवाय न्यायालयात अद्याप दाखल न झालेली,मात्र वादग्रस्त स्वरूपाची प्रकरणेही लोकअदालतीच्या माध्यमातून सोडविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकअदालतीमध्ये दिला जाणारा निर्णय अंतिम स्वरूपाचा असतो.त्यामुळे संबंधित पक्षांना दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेतून दिलासा मिळतो. सामोपचाराने तोडगा निघाल्यामुळे दोन्ही पक्षांचा विजय होतो,वेळ व खर्चाची बचत होते तसेच परस्परांतील कटुता कमी होऊन सामाजिक सलोखा वाढण्यास मदत मिळते.विशेष म्हणजे, लोकअदालतीमध्ये तडजोड झाल्यास नियमानुसार भरलेली न्यायालयीन फी संबंधितांना परत मिळण्याची तरतूद आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्ह्यातील सर्व नागरिक,पक्षकार तसेच वकील बांधवांना आवाहन केले आहे की,त्यांनी आपल्या प्रलंबित किंवा तडजोडपात्र प्रकरणांमध्ये सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे अधिक्षक,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!