Friday, May 8, 2026
Homeगडचिरोलीव्यायामशाळा,क्रीडांगण व युवक कल्याण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.. - ग्रामपंचायत,शाळा,महाविद्यालये व...

व्यायामशाळा,क्रीडांगण व युवक कल्याण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.. – ग्रामपंचायत,शाळा,महाविद्यालये व शासकीय यंत्रणांसाठी प्रस्ताव आमंत्रित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत सन २०२६-२७ या सत्राकरीता व्यायामशाळा विकास अनुदान योजना,क्रीडांगण विकास अनुदान योजना व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत क्रीडा कार्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रचार,प्रसार व जोपासणा करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत नविन व्यायामशाळा बांधकाम करणे यासाठी अनुदान देण्यात येते.तसेच व्यायाम साहित्य(इनडोअर)व ओपन जिम (खुले व्यायाम साहित्य) साहित्याचा पुरवठा पुरवठाधारकाकडून करण्यात येतो.तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे,२००/४०० मीटरचा धावणमार्ग तयार करणे,विविध खेळाची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे,क्रीडांगणावर प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे,भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती भिंतीचे अथवा तारेचे कुंपन करणे इत्यादी बाबी तयार करण्याकरीता संबंधित शाळा/संस्थेस अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.सदर अनुदानाचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा,महविद्यालये याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा तसेच ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा इत्यादींनी सदर योजनेचा लाभ घेऊन सुविधा निर्माण करण्याकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव येत्या,३० मे २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे सादर करावा.विशेषत: गावातील नागरीकांना शारीरिक कवायतीकरीता लाभ पोहचावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने खुली व्यायामशाळा(ओपन जिम)चे साहित्य प्राप्त करुन घेण्याचे दृष्टीने विनाविलंब प्रस्ताव या कार्यालयात सादर करावा.सदर योजने संदर्भात अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी इच्छुक शाळा/संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स,गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात...

हेलिकॉप्टरने उड्डाण भरली अन् वादळ-वाऱ्याचा जोर.. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आठ जण हेलिकॉप्टरमध्ये; इमर्जन्सी लँडिंग..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आज,गुरुवार ७ मे रोजी दुपारच्या सुमारास अचानकपणे बदलेल्या खराब हवामानाचा मोठा फटका...

मोफत तीर्थक्षेत्रांना जायचेय; तर करा अर्ज.. – “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील...

युवक,युवती व संस्थांनी जिल्हास्तरीय युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.. – पहा पात्रतेचे निकष व पुरस्कारासाठी मुल्यांकन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये १२ नोव्हेंबर,२०१३ च्या शासन निर्णयानुसार,जिल्ह्यातील युवक,युवती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!