Tuesday, September 22, 2026
Homeकोरचीगजबचा कारनामा..! नाडेकल-बेटकाठी-ढोलीगोटा मार्गावरील पूल वापराआधीच कोसळला.. -आमदार मसरामांची कंत्राटदार आणि जबाबदार...

गजबचा कारनामा..! नाडेकल-बेटकाठी-ढोलीगोटा मार्गावरील पूल वापराआधीच कोसळला.. -आमदार मसरामांची कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील नाडेकल-बेतकाठी-ढोलीगोटा मार्गावरील खोब्रागडी नदीवरील पुलाबाबत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित बांधकाम करण्यात आलेला पूल वापरात येण्यापूर्वीच कोसळल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे,या पुलाचे एक पिल्लर तसेच दोन स्लॅब हे एकदा नव्हे,तर तब्बल दोनदा कोसळले.त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका निर्माण झाली असून,संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजावर बोट ठेवण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार,पुलाचा तुटलेला भाग दिसू नये,यासाठी सिमेंट-काँक्रिटचे अवशेष रेतीखाली दाबण्यात आले.या प्रकारामुळे केवळ भ्रष्टाचाराचाच नव्हे,तर नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोपही होत आहे.दरम्यान,या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.मात्र,चौकशी अहवालानंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली.पाहणीनंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे,वापरात येण्यापूर्वीच पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने भविष्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जर हा पूल वापरात आला असता,तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता आली नसती,अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली असून,संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
  • रामदास मसराम,आमदार,आरमोरी विधानसभा क्षेत्र👇
सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून,नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ केला जात आहे.दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!