Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सोशल मीडियावर लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी फसवणूक करणारे कधी काय करतील याची शास्वतीच नाही.आकर्षक ऑफर,कमी कागदपत्रांमध्ये मोठे कर्ज किंवा सरकारी योजनेच्या नावाखाली आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.अश्यातच आता एका नव्या फसवणुकीसाठी चोरट्यांनी यंत्रणा तयार केल्याचे उघड झाले आहे.ज्यात “प्रधानमंत्री लोन योजना आधारकार्ड पे,तीन लाख रुपये लोन हर किसिको,अभी अप्लाई करे” असे म्हणून केवळ आधार कार्डवर तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल,असे सांगितले जात आहे. यासाठी फार कमी कागदपत्रांची गरज असल्याचा दावा केला जातो.त्याच बरोबर लोकांचा विश्वास बसावा, यासाठी जाहिरातीत सरकारी योजनांसारखे दिसणारे ग्राफिक्स, “अप्लाई नाऊ” सारखे शब्द,तसेच क्यूआर कोड आणि लिंक दिल्या जात आहेत.मात्र,सरकारने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने(PIB)स्पष्ट केले की,प्रधानमंत्री लोन योजना आधारकार्ड पे,तीन लाख रुपये लोन हर किसिको,अभी अप्लाई करे” अशी कुठलीही लोन स्कीम योजना नसून अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेकदा बनावट जाहिरातींमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्ते बनावट वेबसाइट किंवा ॲपवर पोहोचतात.तेथे आधार क्रमांक,मोबाईल नंबर,बँक खाते,ओटीपी किंवा इतर वैयक्तिक माहिती मागितली जाते.ही माहिती मिळाल्यानंतर फसवणूक करणारे लोक आर्थिक गैरव्यवहार करू शकतात.अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी सोशल मीडियावर दिसणाऱ्या संशयास्पद जाहिरातींवर क्लिक करणे टाळावे.कोणतीही योजना खरी आहे की नाही, लहे नेहमी सरकारी पोर्टल किंवा अधिकृत संकेतस्थळावर तपासावे.तसेच अनोळखी वेबसाइट किंवा ॲपवर वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!