Saturday, October 3, 2026
Homeमुंबईकामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच
माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक ठिकाणी जड गोण्यांची चढउतार करतांना कामगारांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास सहन करावा लागतो.अनेकदा ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलतांना त्यांच्या शरीरावर ताण येतो.यामुळे पाठदुखी,सांधेदुखी आणि इतर गंभीर व्याधी निर्माण होण्याची शक्यता वाढते.विशेषतः वय वाढल्यानंतर या त्रासाचे प्रमाण अधिक वाढते.त्यामुळे या कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गोण्यांच्या वजनावर मर्यादा घालणे अत्यावश्यक असल्याने राज्य सरकारने कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.त्यानुसार,आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन कमाल ५० किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत कामगार संघटना,व्यापारी संघटना,कामगार विभाग,तसेच किराणा बाजार आणि दुकाने मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच हा निर्णय अंतिम करण्यात आला.त्यामुळे हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य सरकारने बाजार समित्यांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.सर्व शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी गोण्यांचे वजन ५० किलोच्या मर्यादेत ठेवावे यासाठी जनजागृती करण्यास सांगितले आहे.तसेच बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांची चढउतार होणार नाही,याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!