Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. - गरज...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून(आयएमडी)देण्यात आला आहे.महाराष्ट्रात पुढील काही दिवस अतिउष्णतेचा इशारा देण्यात आल्याने गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार,कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवसांत तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.तर विदर्भासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून तिथे तापमानाचा पारा तीन अंशांनी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर,मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिल, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल,तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे,हलके व सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर जातांना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.सावलीत विश्रांती घेणे व घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.जेष्ठ नागरिक व मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत आणि उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे.महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४० अंशावर-पुणे-४१.८, जळगाव-४२.८,सांगली-४१.८,सातारा-४०.९,सोलापूर- ४३.९,मालेगाव-४३.२ तर विदर्भातील जिल्ह्याचा पारा ४२ च्या पुढे-अकोला-४४.२,अमरावती-४४,बुलढाणा- ४२.४,चंद्रपूर-४२.६,गोंदिया-४२,नागपूर-४३.४,वाशीम- ४२.६,वर्धा- ४३.९,यवतमाळ-४२.८ तर मराठवाड्यातील धाराशिव-४१,छत्रपती संभाजीनगर-४१,परभणी-४२ आणि बीड -४३.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!