Thursday, July 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसेक्युरिटी गार्डची ऑर्डर काढण्यास मदत व दर महिन्याला कंपनीला हजेरीपट पाठवण्यासाठी ३०...

सेक्युरिटी गार्डची ऑर्डर काढण्यास मदत व दर महिन्याला कंपनीला हजेरीपट पाठवण्यासाठी ३० हजाराची लाच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बाल निरीक्षण गृहाच्या एका सेक्युरिटी गार्डची ऑर्डर काढण्यास मदत व दर महिन्याला कंपनीला हजेरीपट पाठवण्यासाठी ३० हजाराची लाच घेतांना कनिष्ठ संरक्षण अधिकारी, अतिरिक्त पदभार,अधिक्षक शासकीय निरीक्षण गृह बीड यांना जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.कपिल भिमराव कांबळे वय ४३ वर्षे,पद-कनिष्ठ संरक्षण अधिकारी,अतिरिक्त पदभार,अधिक्षक शासकीय निरीक्षण गृह बीड,वर्ग ३,रा.पंचशील नगर,बीड असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदार यांची स्मार्ट सर्विसेस कंपनी पुणे यांचे मार्फतीने सिक्युरीटी गार्ड म्हणून बाल निरीक्षण गृह बीड येथे नेमणूक झाल्याने सदर ठिकाणी रुजू झालेले आहेत.त्या ठिकाणी अधिक्षक म्हणून कपिल कांबळे हे काम पाहतात.सेक्युरिटी गार्डची हजेरीची हजेरीपटात नोंद घेऊन त्याचा दर महिन्याला स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी पुणे यांना रिपोर्ट पाठविल्यानंतर स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी पुणे यांचेकडून सेक्युरिटी गार्डचे पगार होते.हजेरीची नोंद घेऊन त्याचा दर महिन्याला कंपनीला रिपोर्ट पाठवण्याचे काम अधीक्षक कपिल कांबळे हे करतात.तक्रारदार हे कामावर रुजू झाल्यापासुन हजेरीची नोंद घेऊन त्याचा कंपनीला रिपोर्ट पाठवण्यासाठी व तक्रारदार यांची सेक्युरिटी गार्डची कंपनी कडून ऑर्डर काढण्याच्या कामात मदत केली म्हणून ४५ हजार रुपयेची लाच मागणी केली.परंतू तक्रारदार यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी काल,सोमवार १३ एप्रिल रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार,काल सोमवारी पथकाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता कपिल कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ऑर्डर काढण्यास मदत केली म्हणून व हजेरीपट दर महिन्याला कंपनीला पाठवण्यासाठी तात्काळ ३० हजार रुपये व उरलेले १५ हजार रुपये तक्रारदार यांचा पगार झाल्यावर स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले.त्यावरुन काल,सोमवार १३ एप्रिल रोजी कांबळे यांचे कारमध्ये पालवण चौक बीड येथे पंचासमक्ष सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडुन ३० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना लाचलुचपत प्रतिंधक विभाग जालनाचे पोलीस उपअधीक्षक बी.एस.जाधवर यांनी व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेतले.कांबळे यांची अंगझडती घेतली असता लाचेचे ३० हजार रुपये व इतर १०० रूपये,एक मोबाईल,दोन पिवळ्या धातूच्या अंगठ्या मिळून आल्या आहेत.प्रकरणी कपिल कांबळे विरोधात पोलीस ठाणे शिवाजीनगर,जि.बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • नागरिकांना आवाहन👇
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना यांचे कडुन आवाहन करण्यात येते कि,एखादा लोकसेवक स्वतः अगर इतरांमार्फत शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खासगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास फोन नंबर ०२४८२-२२०२५२, टोल फ्री.क्रं.१०६४ व मो.क्रं.९७६४०२१०६४ वर संपर्क करावा.तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं.९८८१४६३३६५ व ईमेल dysp.acbjalna@mahapolice.gov.in व dyspacbjalana@gmail.com वर संपर्क करावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!