- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जमीन हस्तांतरण प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपूरच्या डोंगरगाव येथील सरकारी जमिनीच्या अवैध हस्तांतरणाचा आरोप करणारी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली आहे.प्रकरणात न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व निवेदिता मेहता यांनी निर्णय दिला.
राज्य सरकारने संबंधित जमीन सेमाना विद्या व वन विकास प्रशिक्षण मंडळाला दिली असून या जमिनीवर व्ही.एम.इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी कार्यरत आहे.वडेट्टीवार यांनी अवैध मार्गाचा अवलंब करून ही जमीन शिक्षण संस्थाचालक डॉ.मोहन गायकवाड यांना हस्तांतरित केली.त्यामुळे या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे भांगडिया यांचे म्हणणे होते.परंतु,न्यायालयाला या जमिनीच्या हस्तांतरणाचा एकही पुरावा रेकॉर्डवर आढळून आला नाही उलट, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदारांनी चौकशी करून दिलेल्या अहवालामध्ये या जमिनीचे हस्तांतरण झाले नसल्याचे दिसून आले. याशिवाय,डॉ.मोहन गायकवाड यांनीही त्यांच्या नावावर जमिनीचे आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे हस्तांतरण झाले नसल्याचे सांगितले.प्रकरणात न्यायालयाने याचिकेतील आरोप निराधार असल्याचे जाहीर केले व वडेट्टीवारांवर आरोप करणारी भांगडिया यांची याचिका फेटाळली.
- Advertisement -

