Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोली‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ ही मोहीम लोकचळवळ बनली पाहिजे- मंत्री प्रकाश आबीटकर

‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ ही मोहीम लोकचळवळ बनली पाहिजे- मंत्री प्रकाश आबीटकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “आरोग्य यंत्रणा आणि लोकसहभाग यांच्या बळावर अधिक सशक्त व निरोगी महाराष्ट्र घडविणे शक्य आहे. ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ ही मोहीम लोकचळवळ बनली पाहिजे,” असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी  केले.त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली जिल्हा प्रशासन ही मोहीम पूर्ण ताकदीनिशी प्रभावीपणे राबविणार असल्याचा ठाम निर्धार गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी व्यक्त केला.
नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)सभागृहात आयोजित विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गाडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री आबीटकर यांनी उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांना प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित केली.ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी गाडे म्हणाले की,गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हे मोठे आव्हान असले तरी लोकसहभागाच्या बळावर ते साध्य करता येईल.ग्रामपातळीवरील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध असून सर्व यंत्रणांचा समन्वय साधून काम केले जाणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी सांगितले की,दुर्गम भागात अजूनही काही ठिकाणी पारंपरिक समजुती प्रचलित आहेत.त्यामुळे या मोहिमेत गावातील पुजारी व स्थानिक मानकरी यांना सहभागी करून अंधश्रद्धा दूर करणे व नागरिकांना वैज्ञानिक उपचार पद्धतीकडे वळविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी प्रशासकीय समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करतांना सांगितले की,आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पोलीस विभागाचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. दुर्गम भागात सेवा देतांना नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे.या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे तसेच ‘आशा’ स्वयंसेविकांच्या माध्यमातून गावपातळीवर व्यापक जनजागृती केली जाणार असून आरोग्यदायी सवयी रुजविण्यावर भर दिला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!