Sunday, August 30, 2026
Homeनागपूरजमीन हस्तांतरण प्रकरणात आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांची याचिका फेटाळली.. - विजय वडेट्टीवारांना...

जमीन हस्तांतरण प्रकरणात आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांची याचिका फेटाळली.. – विजय वडेट्टीवारांना क्लिनचीट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जमीन हस्तांतरण प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपूरच्या डोंगरगाव येथील सरकारी जमिनीच्या अवैध हस्तांतरणाचा आरोप करणारी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली आहे.प्रकरणात न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व निवेदिता मेहता यांनी  निर्णय दिला.
राज्य सरकारने संबंधित जमीन सेमाना विद्या व वन विकास प्रशिक्षण मंडळाला दिली असून या जमिनीवर व्ही.एम.इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी कार्यरत आहे.वडेट्टीवार यांनी अवैध मार्गाचा अवलंब करून ही जमीन शिक्षण संस्थाचालक डॉ.मोहन गायकवाड यांना हस्तांतरित केली.त्यामुळे या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे भांगडिया यांचे म्हणणे होते.परंतु,न्यायालयाला या जमिनीच्या हस्तांतरणाचा एकही पुरावा रेकॉर्डवर आढळून आला नाही उलट, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदारांनी चौकशी करून दिलेल्या अहवालामध्ये या जमिनीचे हस्तांतरण झाले नसल्याचे दिसून आले. याशिवाय,डॉ.मोहन गायकवाड यांनीही त्यांच्या नावावर जमिनीचे आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे हस्तांतरण झाले नसल्याचे सांगितले.प्रकरणात न्यायालयाने याचिकेतील आरोप निराधार असल्याचे जाहीर केले व वडेट्टीवारांवर आरोप करणारी भांगडिया यांची याचिका फेटाळली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!